जयपूर : या वर्षी होणा-या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तसेच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांतील पराभवानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी शेतक-यांना ५० हजारांची कर्जमाफी जाहीर करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.अर्थसंकल्प मांडताना त्यांनी ही घोषणा केली. राजे यांच्याकडेच अर्थखात्याचा कार्यभारही आहे. या कर्जमाफीमुळे सरकारच्या तिजोरीवर ८ हजार कोटींचा बोजा पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकºयांच्या कर्जमाफीवरून राजस्थानात कमालीचा असंतोष खदखदत होता. या नाराजीचे प्रत्यंतर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पाहायला मिळाले.दोन लोकसभा आणि एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा जोरदार पराभव केला होता.
राजे यांचा ज्येष्ठांना खूष करण्याचा प्रयत्न८० हून अधिक वय असलेल्या नागरिकांना राज्यात परिवहन मंडळाच्या वाहनाने मोफत, तर त्यांच्यासोबत प्रवास करणाºया नातेवाईकाला निम्म्या तिकीट दराने प्रवास करता येईल, अशीही घोषणा राजे यांनी केली.