राजनांदगांव - छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने शेतकरी व आदिवासी यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.येथे प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशातील १२५ हून अधिक लोक रांगेत उभे राहून मरण पावले. मोदी सरकारने अख्ख्या देशाला रांगेत उभे राहण्यास भाग पाडले. पण नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि ललित मोदी देशाचा पैसा घेऊन परदेशात फरार झाले, तेव्हा हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसून राहिले. नोटाबंदी हा मोदींनी घेतलेला तुघलकी निर्णय होता आणि जीएसटी म्हणजे तर गब्बर सिंग टॅक्सच आहे, असा आरोपही त्यांनी केला.या देशातील तरुणांचा रोजगार घालवण्याचे कामच या पंतप्रधानांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी केले, शेतकºयांच्या शेतीमालाला भाव मिळू दिला नाही आणि कर्जबुडव्या उद्योगपतींना मात्र बँकांतून अधिकाधिक पैसा दिला गेला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पंजाबमध्ये तसेच कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर लगेचच आम्ही शेतकºयांची सर्व कर्जे माफ करून दाखवली आहेत. (वृत्तसंस्था)नक्षलग्रस्त भागात घेणार प्रचार सभाराहुल गांधी २ दिवसांच्या छत्तीसगड दौºयावर आहेत. ते नक्षलग्रस्त भागांमध्ये काही सभा घेणार आहेत. तेथील पहिल्या टप्प्याचा प्रचार उद्या, शनिवारी दुपारी संपत आहे.त्याआधीची शेवटची काँग्रेसची सभाही तेच घेणार आहेत. नक्षलग्रस्त भागाच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 5:34 AM