चंदीगड - राज्यातील अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी पंजाब सरकराने पावले उचचली आहेत. आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापुढे पंजाबमध्ये शासकीय नियुक्तीपूर्वी कर्मचाऱ्यांना उत्तेजक चाचणी द्यावी लागणार आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव पंजाब सरकारने काही दिवसांपूर्वीच तयार केला होता. त्यानंतर आता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नियुक्तीवेळी कर्मचाऱ्यांना उत्तेजक चाचणी द्यावी लागणार आहे. तसेच नियुक्तीनंतरही अशा प्रकारची चाचणी होईल.
शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी करण्याचा पंजाब सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 10:35 PM