आयआयटीमार्फत होणार बसमार्गांचे सर्वेक्षण तोटा कमी करण्यासाठी निर्णय : एनएमएमटीचे ४४ पैकी ४१ बसमार्ग तोट्यात
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
नामदेव मोरे, नवी मुंबई : एनएमएमटीच्या बसेस रोज जवळपास ६८ हजार किलोमीटर धावत आहेत. प्रतिकिलोमीटर उपक्रमास ७ रुपयांचा तोटा होत आहे. ४४ पैकी तब्बल ४१ बसमार्ग तोट्यात आहेत. तोटा कमी करण्यासाठी उपक्रमाने आयआयटीमार्फत सर्व बसमार्गांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नामदेव मोरे, नवी मुंबई : एनएमएमटीच्या बसेस रोज जवळपास ६८ हजार किलोमीटर धावत आहेत. प्रतिकिलोमीटर उपक्रमास ७ रुपयांचा तोटा होत आहे. ४४ पैकी तब्बल ४१ बसमार्ग तोट्यात आहेत. तोटा कमी करण्यासाठी उपक्रमाने आयआयटीमार्फत सर्व बसमार्गांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरवासीयांना चांगली बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने एनएमएमटी उपक्रम सुरू केला. सद्यस्थितीमध्ये २९७ बसेस नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरणपर्यंत सेवा देत आहेत. दिवसभरात सर्व बसेसच्या सरासरी १५१२ फेर्या होत आहेत. जवळपास ६७१९८ किलोमीटर बसेस धावत असून दिवसाला जवळपास २५ लाख ८० हजार ९३६ रुपये उत्पन्न मिळत आहे. मासिक पासपासून जवळपास २ लाख ८० हजार रूपये उत्पन्न मिळत आहे. परंतु उपक्रम चालविण्यासाठी होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याची स्पष्ट झाले आहे. प्रतिकिलोमीटर एक बसला ४९ रुपये खर्च होत असून उत्पन्न मात्र ४१ रुपये ९५ पैसे एवढे होत आहे. प्रतिकिलोमीटर ७ रुपये पाच पैसे तोटा होत आहे. एनएमएमटीचे ४४ पैकी ४१ बसमार्ग तोट्यात सुरू आहेत. फक्त ३ बसमार्ग नफा मिळवून देत आहेत. उपक्रमाचा तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाने सर्व मार्गांचे आयआयटीमार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित संस्थेकडे सर्वेक्षणासाठीचे पैसे भरण्यात आले आहेत. लवकरच शास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वेक्षण होणार आहे. सर्व रेल्वे स्टेशनपासून एमआयडीसीकडे जाणार्या मार्गांचेही सर्वेक्षण करून बससेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. जानेवारीपूर्वी प्रतिकिलोमीटर तोटा १० रुपयांपेक्षा जास्त होता. उपक्रमाने तोट्यातील मार्गावरील बसफेर्या कमी केल्या आहेत. काही मार्गांवरील बससेवा पूर्णपणे थांबविली आहे. ज्या वेळेमध्ये प्रवाशांची संख्या कमी असते त्या वेळेतील फेर्या कमी केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे तोटा कमी होऊ लागला आहे. परंतु अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. दोन वर्षापूर्वी तिकीटवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर सर्वसाधारण सभेने हा ठराव रद्द केला. यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकलेली नाही. तिकिटाचे दर कमी आहेत. किमान बेस्टएवढे दर असावे, अशी अपेक्षा प्रशासनातील अधिकारी व्यक्त करू लागले आहेत. एनएमएमटी चौकट, नावाने स्वतंत्र फाईल टाकत आहे