नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या दोन सरकारी कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार उद्या, बुधवारी निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.
या दोन कंपन्या आजारी असून, त्यांच्यावर कर्जाचे प्रचंड ओझे आहे. या दोन कंपन्यांना फोर-जी स्पेक्ट्रमही देण्यात येण्याची शक्यता असून, तसे झाल्यास अन्य मोबाइल कंपन्यांशी त्या स्पर्धा करू शकतील. या कंपन्यांना कोणत्या प्रकारे पुनरुजीवित करायचे आणि त्यासाठी किती खर्च करायचे, याचा विचार व निर्णय उद्या होईल, असे एका अधिकाºयाने सांगितले. मात्र पुनरुज्जीवनासाठी ७४ हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज आहे.
याआधी दूरसंचार विभागाने या कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अर्थ मंत्रालयाकडे निधी मागितला होता. पण तो देण्यास अर्थ मंत्रालयाने नकार दिल्याने या कंपन्यांचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला होता. बीएसएनएल व एमटीएनएल या दोन कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची एकत्रित संख्या सुमारे १ लाख ८५ हजार आहे. त्यांचे पुनरुज्जीवन करताना काही कर्मचाºयांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिला जाईल, असे समजते.
या कंपन्यांचे पुनरुज्जीवन करता येईल का आणि ते करायचे झाल्यास ते कसे करावे, आदी बाबींचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट स्थापन केला होता. त्या गटाच्या शिफारशींच्या आधारे उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही कंपन्या तोट्यात व कर्जाच्या बोजाखाली आहेत. बीएसएनएलचा तोटा मोठा असला तरी त्यांची मालमत्ताही खूप आहे. ती मालमत्ता विकून कर्मचाºयांचे पगार देता येतील, अशी शिफारस मंत्रीगटाने केल्याचे समजते.देशभरात १७ हजार एक्स्चेंज आहेत.
एमटीएनएल ही कंपनी मुंबई व दिल्लीत सेवा देते. बीएसएनएलचे प्रमुख पी.के. पुरवार यांनीही कंपनीचे लवकरच पुनरुज्जीवन केले जाईल, असा विश्वास सोमवारी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, बीएसएनएलसाठी केंद्र सरकार १२00 कोटी रुपये मंजूर करेल, अशी आमची अपेक्षा आहे. आमचे मासिक उत्पन्न आजच्या घडीला सुमारे १६00 कोटी रुपये असून, वेतनाखेरीजचा अन्य खर्च किमान ५00 कोटी रुपये आहे.
दिवाळीआधी पगार?
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच कर्मचाºयांना दिवाळीआधी वेतन देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पी. के. पुरवार यांनीही आम्ही कर्मचाºयांना दिवाळीपूर्वी पगार देऊ इच्छितो, असे म्हटले आहे. बीएसएनएल व एमटीएनएल यांच्याकडे मालमत्ता, फायबर आॅप्टिक फायबर व मोबाइल टॉवर्स मिळून अनुक्रमे १ लाख १0 हजार कोटी व ३५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे.