नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेली उच्चाधिकार समिती या आठवड्याच्या अखेरीस आपला अंतिम निर्णय घेईल.सातव्या वेतन आयोगाच्या अहवालावर विचार करण्यासाठी केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव पी. के. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकार समिती नेमली होती. या समितीची अंतिम बैठक ११ जून रोजी होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंबंधी समिती अहवाल अर्थ मंत्रालयाला सादर करील. त्यानंतर, काही दिवसांतच अंमलबजावणीवर निर्णय होऊ शकेल. उच्चाधिकार समितीने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन २१ हजार रुपये, तर कमाल वेतन २.७ लाख असावे, अशी शिफारस केली आहे. आयोगाच्या मूळ शिफारशीपेक्षा किमान वेतन ३ हजारांनी, तर कमाल वेतन २0 हजारांनी जास्त आहे. केंद्राच्या ४७ लाख कर्मचाऱ्यांना, तसेच ५२ लाख निवृत्तांना आयोगाचा लाभ मिळेल.
सातव्या वेतन आयोगावर आठवड्याच्या अखेरीस निर्णय
By admin | Published: June 09, 2016 5:39 AM