साउथम्प्टन : अनेकांना जवळजवळ दररोजच द्विधा मन:स्थितीचा सामना करावा लागतो. सकाळी लवकर उठावे की अलार्म बटण दाबून त्याच्या आवाजाचा गळा घोटावा? आज भाजीमंडईत जावे की जाऊ नये? आज कोणता शर्ट घालावा, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे आपल्यावर डोके खाजवण्याची वेळ येते. यासारख्या छोट्या निर्णयांमुळे तुम्हाला इतका ताण का वाटतो, हे समजून घेतले तर तो ताण टाळण्यास मदत होऊ शकते.
अशा क्षुल्लक निर्णयांचा अतिविचार करणारे लोक सहसा मूर्ख वाटतात, परंतु संशोधन असे दर्शविते की, अशा प्रकारे विचार करण्यामागे अनेक तार्किक कारणे आहेत. काहीवेळा बरेच पर्याय असल्यामुळे त्यांची तुलना करणे आणि फरक करणे आपल्यासाठी कठीण होते. अर्थशास्त्राच्या विद्वानांनी अधिक पर्याय असण्याच्या कल्पनेचे समर्थन केले आहे. पण अमेरिकी मानसशास्त्रज्ञ शीना अय्यंगार आणि मार्क लीपर यांनी या कल्पनेला आव्हान दिले.त्यांच्या एका अभ्यासात, त्यांनी जॅम तपासण्यासाठी सुपरमार्केटमध्ये एक टेबल सेट केले. जेव्हा ग्राहकांना कमी पर्याय दिले गेले तेव्हा जॅम अधिक विकले गेले. या निष्कर्षांवर आधारित, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बॅरी श्वार्ट्झ यांनी त्यांच्या पुस्तकात असा युक्तिवाद केला आहे की, अनेक पर्याय असण्याने लोकांची चिंता वाढू शकते.संशोधकांना काय आढळले?संशोधकांनी निर्णय घेण्याची दोन प्रमुख धोरणे ओळखली आहेत : कमाल मर्यादा गाठणे (मॅक्सिमायझिंग) आणि सर्वोच्च समाधान (सॅटिसफाईजिंग). एकापेक्षा जास्त पर्याय शोधण्याची व सर्वोत्तम पर्याय शोधण्याची प्रवृत्ती म्हणजे ‘मॅक्सिमायझिंग’. ‘सॅटिसफाईजिंग’ आणि ‘मॅक्सिमायझिंग’ हे व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांशी जोडलेले आहे. काही लोक उच्च सीमेपर्यंत जातात, तर काही लवकर संतुष्ट होतात. ‘मॅक्सिमायझिंग’ प्रवृत्ती असलेले लोक इतर लोकांपेक्षा निर्णय घेतल्यानंतर अधिक पश्चात्ताप करतात.
सवय झाली की, ताण कमी...सवयी निर्माण करण्यासाठी वेळ काढल्याने दररोजच्या निर्णयांचा अतिविचार करण्यापासून रोखता येईल. दररोज वेळेवर उठणे, नंतर कॉफी बनवणे ही एक सवय बनली की, त्यामुळे तुम्हाला दररोजच्या किरकोळ गोष्टींचा अतिविचार टाळण्यास मदत होते. म्हणजेच ताण टळतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.