शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

सफाई कर्मचार्‍यांची अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी

By admin | Published: December 03, 2015 12:37 AM

जळगाव : अनुकंप तत्वावर व वारह हक्काचे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावे, या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी केली. प्रश्न सुटला नाही, तर न्यायालयात दाद मागणार, प्रसंगी पोलिसातही गुन्हा दाखल करणार असा इशाारा पदाधिकार्‍यांनी दिला.

जळगाव : अनुकंप तत्वावर व वारह हक्काचे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावे, या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी केली. प्रश्न सुटला नाही, तर न्यायालयात दाद मागणार, प्रसंगी पोलिसातही गुन्हा दाखल करणार असा इशाारा पदाधिकार्‍यांनी दिला.
अखिल भातीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांच्यासह पदाधिकारी यांनी आयुक्तांची भेट घेतली. सफाई कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी राबविण्यात येणारे नाशिक पॅटर्न हे अन्यायकारक आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या हक्कावर गदा आणणारे आहे. कुठलेही कारण नसताना सुमारे दोन वर्षांपासून सफाई कर्मचार्‍यांना त्यांचे वारस हक्काच्या नोकरीपासून वंचित का ठेवले जात आहे? असा प्रश्न उपस्थित पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना विचारला.
बेकायदेशीर ठरावाच्या विरोधात न्यायालयात जाणार
पदाधिकार्‍यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त म्हणाले, की वारस हक्कासाठी समिती नेमलेली आाहे. समितीचे अध्यक्ष अपर आयुक्त साजीदखान पठाण आहेत. त्यांच्या निर्णयानुसार नाशिक पॅटर्न मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवण्यात आला होता. हे पॅटर्न सफाई कर्मचार्‍यांसाठी अन्यायकारक आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास न्यायालयात दाद व पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा सफाई कर्मचार्‍यांनी प्रशासनाला दिला आहे.
आयुक्तांच्या दालनाबाहेर पदाधिकारी आक्रमक
अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे पदाधिकारी दुपारी एक वाजता आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र, सुरुवातीला आयुक्तांनी भेट घेण्यास नकार दिला. त्यानंतर सफाई कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त करण्यास अर्वोच्च भाषेत घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. कालांतराने आयुक्तांनी सफाई कर्मचार्‍यांना दालनात बोलवून त्यांना विश्वासात घेत माहिती दिली. त्यानंतर सफाई कर्मचारी शांत झाले.

प्रशासनासमोर पेच
सद्य:स्थितीत मनपाच्या आस्थापनेसाठी ५३ टक्के खर्च झाला आहे. वास्तविक हा खर्च ४२ टक्के होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचारी नव्याने भरती करताना मनपा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.