ऑनलाइन लोकमत
मद्रास, दि. 10 - 500 आणि 1000 रूपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली होती. मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
केंद्र सरकारने घातलेली बंदी योग्य ठरवत हा निर्णय देशहितासाठीच असून या निर्णयामुळे देशाचा फायदा होईल असं न्यायालयाने म्हटलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल झाली असून 15 नोव्हेबरला त्यावर सुनावणी होणार आहे. त्यापुर्वी मद्रास उच्च न्यायालयाचा हा निर्णय केंद्र सरकारसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.