बिलासपूर : विवाहाला नकार देणे, हे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कारण मानले जाणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा बिलासपूर हायकोर्टाने दिला आहे. विवाहाला नकार दिल्यास एखाद्या तरुणाने किंवा तरुणीने आत्महत्या केल्यास एकमेकांविरुद्ध खटला दाखल होऊ शकत नाही. अशा प्रकरणात मुलाने वा मुलीने आत्म्हत्या केल्यास भादंवि कलम ३०६ तहत दंडनीय गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा एका प्रकरणात निर्णय देताना दिला.विवाहाला नकार देणे हे केवळ आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कारण मानता येऊ शकत नाही, असा निर्णय छत्तीसगड हायकोर्टाचे न्यायाधीश अरविंद सिंह चंदेल यांनी दोन वर्षांपूर्वीच्या एका घटनेशी संबंधित प्रकरणात दिला.दोन वर्षांपूर्वी धमतरी जिल्ह्यातील कोहका कोलियारी गावातील कुसुमलच आणि मानसिंह यांच्यात विवाहाची बोलणी चालू होती. दरम्यान मुलाकडील मंडळी मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी गेले. नंतर काही कारणांमुळे मुलाकडील लोकांनी विवाहाला नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या युवतीने आत्महत्या केली होती.
‘विवाहास नकार हे आत्महत्येस प्रवृत्त करणारे कारण नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:04 AM