हरीश गुप्ता, नवी दिल्लीराजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेस (आरजीजीव्हीवाय) दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना (डीडीयूजीजेवाय) असे नाव देण्यात आले असून ग्रामीण भागातील विद्युतीकरणासाठी नवे नामकरण ही खास ओळख बनली आहे. खा. विजय दर्डा यांनी गुरुवारी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नियोजन राज्यमंत्री राव इंदरजितसिंग यांनी ही धक्कादायक कबुली दिली. ‘निर्मल भारत अभियान’ऐवजी ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) असे नवे नाव देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातील अनेक योजनांची नावे बदलण्यात आली काय? नावे बदललेल्या अशा योजनांबाबत तपशील दिला जावा. केंद्र सरकारच्या योजनांची नावे बदलण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे काय? हे जाणून घेण्याची इच्छा खा. दर्डा यांनी व्यक्त केली होती. त्यावर योजनांची नावे बदलण्यात आल्याची कबुली देतानाच सिंग म्हणाले की, नाव बदलण्याचा प्रस्ताव देताना मंत्री आणि विभागांनी औपचारिक आणि नियमित अशी मार्गदर्शक नियमावली जारी केलेली नाही.
राजीव गांधी योजनेस आता दीनदयाल उपाध्याय यांचे नाव
By admin | Published: December 19, 2014 4:15 AM