उच्च कृषीतंत्रज्ञानामुळे शेतकर्यांच्या प्रगतीस हातभार दीपक केसरकर : जैन इरिगेशन प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी व्यक्त केली भावना
By admin | Published: December 20, 2015 11:59 PM
जळगाव : जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा महाराष्ट्रातील शेतकरी करीत असतो. पाण्याच्या बचतीतून भरपूर उत्पादन घेत असल्याने शेतकर्यांच्या प्रगतीस हातभार लागत असतो. भविष्यातील उर्जेच्या संकटावर जैन सौर पंप शेतकर्यांसाठी लाभदायी ठरतील अशी प्रतिक्रिया राज्याचे वित्त व नियोजन, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नोंदविली.
जळगाव : जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा महाराष्ट्रातील शेतकरी करीत असतो. पाण्याच्या बचतीतून भरपूर उत्पादन घेत असल्याने शेतकर्यांच्या प्रगतीस हातभार लागत असतो. भविष्यातील उर्जेच्या संकटावर जैन सौर पंप शेतकर्यांसाठी लाभदायी ठरतील अशी प्रतिक्रिया राज्याचे वित्त व नियोजन, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नोंदविली.रविवारी सकाळी त्यांनी जैन इरिगेशनच्या सौर पंप, साडे आठ मेगावॅट सौर उर्जा निर्मिती, टिश्युकल्चर आणि फळप्रक्रिया प्रकल्पांना भेट दिली. त्यांचे स्वागत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी केले. जैन एनर्जी पार्क येथे पाचशे एकर उंच सखल, शेती करण्यास अयोग्य असलेल्या जमिनीवर साडे आठ मेगावॅट सौर उर्जा वीज निर्मिती प्रकल्पाची माहिती अशोक जैन यांनी यावेळी केसरकर यांना दिली. यावेळी मनपाचे नगरसेवक अमर जैन उपस्थित होते.