नवी दिल्ली :काँग्रेस पक्षाच्या तीन राष्ट्रीय प्रवक्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.दीपेंदर हुड्डा, गौरव वल्लभ आणि नासिर हुसैन यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार राजीनामा दिल्याचे गौरव वल्लभ यांनी सांगितले. रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
'आमच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार मी, दीपेंद्र हुडा आणि सय्यद नासिर हुसेन यांनी नवीन अध्यक्षांच्या निष्पक्ष निवडणुकीसाठी राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे, असंही गौरव वल्लभ म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची खरगेंची तयारी; सोनिया गांधींकडे प्रस्ताव सादर
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बाजूने प्रचाराची जबाबदारी या तिघांना देण्यात आली आहे. 'मी नेहमीच तत्त्वांसाठी लढलो आहे. मला पुन्हा लढायचे आहे आणि तेच तत्व घेऊन पुढे जाईन,असं काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे मल्लिकाजुर्न खर्गे म्हणाले.
"मी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी मी उदयपूरमध्ये घेतलेल्या 'एक व्यक्ती एक पद' या पक्षाच्या निर्णयानुसार राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आज मी अधिकृतपणे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्रचाराला सुरुवात करत आहे. आज गांधीजी आणि शास्त्रीजींचा जन्मदिन आहे, म्हणून मी हा दिवस निवडला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही, असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची खरगेंची तयारी
राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याचा लेखी प्रस्ताव मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे.काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आज हे पत्र पक्षाच्या अध्यक्षांकडे पाठविले. काँग्रेसने ‘एक व्यक्ती एक पद’ हे धोरण स्वीकारल्यामुळे त्यांनी हे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खरगे यांच्या या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापुर्वी असल्याने नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"