शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 11:30 AM

पद्मावत सिनेमाबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित पद्मावती या सिनेमाचं नाव बदलून आता पद्मावत करण्यात आलं आहे. एखाद्या सिनेमात पाच ते सहा बदल करून सिनेमा प्रदर्शनाला मंजुरी दिली जाते. पण पद्मावत सिनेमाबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भन्साळीच्या 'पद्मावत'मध्ये सेन्सॉर बोर्डाने ५ बदल सुचविल्याचं सांगण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात 'पद्मावत'मध्ये पाच नसून ३००हून अधिक बदल करण्यात आले आहेत.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, सिनेमामध्ये जिथेही मेवाड, दिल्ली आणि चित्तोड या शब्दांचा उल्लेख असेल ते शब्द कट केले जाणार आहेत. याचाअर्थ प्रेक्षक जेव्हा मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पाहतील तेव्हा जी कहाणी ते पाहत आहेत, ती वास्तवात कुठे घडली आहे, याचा अर्थच प्रेक्षकांना उलगडणार नाही. पद्मावत सिनेमा पुन्हा एडिट करण्यासाठी एडिटर्स दिवस-रात्र एक करून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमाबद्दल आत्तापर्यंत घडलेली प्रत्येक घडामोड प्रेक्षकांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे. सिनेमा नेमका कशा प्रकारे असेल हे आता 25 जानेवारीला समजणार आहे. 

2018च्या सुरूवातील सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल प्रेक्षकांना थोड्या अपेक्षा होत्या. स्पेशल कमिटीच्या सहाय्याने सेन्सॉर बोर्डाने पाच संशोधनानंतर सिनेमाला  U/A सर्टिफिकेटसह प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला. 

पद्मावत या सिनेमात अभिनेत्री दीपिका पादूकोण हिने राणी पद्ममिनीची भूमिका साकारली असून अभिनेता शाहिद कपूर महारावल रतन सिंह आणि रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता पण सिनेमाला होणार विरोध पाहता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.  

टॅग्स :Padmavatiपद्मावतीDeepika Padukoneदीपिका पादुकोणRanveer Singhरणवीर सिंगShahid Kapoorशाहिद कपूरSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी