मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं भाजपा नेत्यांकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणवर टीका सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी दीपिकानं जेएनयूच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. यानंतर दीपिका तुकडे-तुकडे गँगची सदस्य असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून करण्यात आली. दीपिकाच्या आगामी छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन सोशल मीडियावरुन करण्यात आलं. त्यासाठी #boycottchhapaak वापरण्यात आला.दीपिकानं जेएनयूच्या कॅम्पमध्ये जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणं सोशल मीडियावर काहींना रुचलेलं नाही. त्यामुळेच दीपिकाच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ट्विटरवरुन करण्यात येत आहे. अनेकांनी तर छपाकची तिकीटं आपण रद्द केल्याचं म्हणत तसे स्क्रिनशॉट्सदेखील ट्विटरवर शेअर केले आहेत. अधिकाधिक लोकांनी छपाकवर बहिष्कार घालावा या उद्देशानं हे स्क्रिनशॉट्स शेअर केले जात आहेत. पण ही सगळी तिकिटं अगदी सारखीच असल्याचं लक्षात येत आहे.
'छपाक'वर बहिष्कार घालायला गेले अन् तोंडावर पडले; जाणून घ्या नेमके काय घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 8:44 AM