माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत; पाकिस्तानातील विमान दुर्घटनेबद्दल मोदींकडून दु:ख व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 08:02 PM2020-05-22T20:02:11+5:302020-05-22T20:08:39+5:30
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला कराची विमानतळाजवळ अपघात
नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. पाकिस्तानातील विमान दुर्घटनेत झालेल्या नुकसानामुळे दु:ख झालं असून माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत असल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Deeply saddened by the loss of life due to a plane crash in Pakistan. Our condolences to the families of the deceased, and wishing speedy recovery to those injured.
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2020
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राहुल गांधी यांनीदेखील विमान अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'पाकिस्तानातल्या विमान दुर्घटनेबद्दल ऐकून दु:ख वाटलं. यामध्ये अनेकांना मृत्यू झाला आहे. यातून काही जण वाचले आहेत, हा आशेचा किरण आहे. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत,' असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
I’m sorry to hear about the air crash in Pakistan in which many lives have been lost. News of survivors is a ray of hope & I pray that there are many miraculous stories of survival tonight. My deepest condolences to the families of those who have perished.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2020
आज दुपारी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात झाला. लाहोरहून कराचीला जाणारं विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. हे विमान रहिवासी भागात विमान कोसळलं. या विमानात ९१ प्रवासी आणि ८ कर्मचारी होते. विमान रहिवासी भागात अपघातग्रस्त झाल्यानं तिथे राहणाऱ्या काही जणांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. घटना स्थळावरुन आतापर्यंत ११ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
विमानाच्या लँडिंगच्या मिनिटभर आधी अपघात झाल्याचं पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या विमानात जवळपास ९० प्रवासी आणि कर्मचारी होते. विमान कोसळताच त्यानं पेट घेतला. यामध्ये विमानतळाशेजारील मॉडेल टाऊन परिसरातील ४-५ घरं जळून खाक झाली. या भागातील काही गाड्यांचंदेखील मोठं नुकसान झालं.
लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात
पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका
"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"
भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....