मराठीत पहिल्यांदाच!!‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची पत्नी आणि ‘द चान-झुकेरबर्ग इनिशिएटिव्ह’ या नव्या उपक्रमाची सह-संस्थापकमाझे आईवडील अमेरिकेत आले ते व्हिएतनाममधून पळून ! रेफ्यूजी म्हणून !मी आणि माझ्या दोन बहिणी. आम्ही तिघी दोन वेगवेगळ्या जगांमध्ये ताणलेल्या एका विचित्र तणावात वाढलो.फार अबोल होते मी. घाबरीघुबरी, बावचळलेली, कशाचीच खात्री नसलेली.आपल्याला काय आवडतं याचा अंदाज नसलेली.आजूबाजूच्या हुशार मुलामुलींकडे पाहून मनातून आणखीच कोमेजून जाणारी!...पण माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी संधींची दारं उघडली, आणि हार्वर्डमध्ये शिकायला गेले, तेव्हा मार्क भेटला.मार्क झुकेरबर्ग!त्यानं माझं आयुष्य बदललं, मी त्याचं... आणि आमची मुलगी मॅक्स; तिनं आम्हा दोघांचं!! ‘फेसबुक’ ही या सगळ्याच्या मध्ये घडलेली गोष्ट!!
स्वतःसाठी घ्या, स्नेहीजनांना 'दिवाळी भेट' पाठवा ! भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी ऑनलाईन खरेदीची व्यवस्था आहे. त्यासाठी इथे क्लिक करा...