शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

बजरंग दलाची बदनामी, जनताच घेईल बदला; काॅंग्रेसला द्यावा लागेल पापाचा हिशेब - विहिंप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 9:43 AM

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी सत्तेत आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचा पक्षापुढे कोणताही प्रस्ताव नव्हता, असे सांगितल्यानंतर विहिंपचे हे वक्तव्य आले

नवी दिल्ली : बजरंग दलाची बदनामी करून पाप केल्याचे आता काँग्रेसला कळले असले तरी कर्नाटकातील जनता त्यासाठी त्यांना (काँग्रेसला) माफ करणार नाही. या पापाचा हिशेब राज्यातील जनता काँग्रेसकडून १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत घेईल, असे विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) गुरुवारी म्हटले आहे. परिषदेने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना हिंदू समाजाची माफी मागून पक्षाचा जाहीरनामा त्वरित बदलण्यास सांगितले आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी सत्तेत आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचा पक्षापुढे कोणताही प्रस्ताव नव्हता, असे सांगितल्यानंतर विहिंपचे हे वक्तव्य आले आहे. बजरंग दल ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न विश्व हिंदू परिषदेची युवा शाखा आहे.काँग्रेसचा जाहीरनामा जाळला

भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी गुरुवारी येथे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याची प्रत जाळली आणि कर्नाटकात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्याबद्दल विरोधी पक्षावर टीका केली. बजरंग दल ही ‘देशभक्त संघटना’ असल्याचे सांगून माजी उपमुख्यमंत्री म्हणाले की, “बजरंग दलावर बंदी घालण्याची त्यांची (काँग्रेस) हिंमत कशी झाली?”