लखनऊः चार दिवसांचं डिफेन्स एक्स्पो उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बटण दाबून डिफेन्स एक्स्पो 2020चं उद्घाटन केलं आहे. या चार दिवसांच्या परिषदेत 70हून अधिक देशांतील 1028 संरक्षण उपकरणांच्या संबंधित कंपन्या आपल्या उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करत आहेत. यात 856 भारतीय आणि 172 परदेशी कंपन्या आहेत. या चार दिवसांच्या आयोजनात 39 देशांतील संरक्षण मंत्र्यांनीही सहभाग घेतला आहे. डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताची आत्मनिर्भरता एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. आमच्यावर मानवतेला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे. तसेच शेजारील राष्ट्राच्या सुरक्षेचं उत्तरदायित्वसुद्धा आमच्यावर आहे. आमच्यासमोर सुरक्षेशी संबंधित अनेक आव्हानं आहेत. संरक्षण उत्पादनांच्या बाबतीत आमचे विचार कोणत्याही दुसऱ्या देशाच्या विरोधात नाही. भारतानं नेहमीच जागतिक शांततेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारताकडे जगातला एक प्रमुख एरोस्पेस दुरुस्ती आणि ओव्हरहॉल हब बनण्याची क्षमता आहे. भारतात संरक्षण उत्पादन क्षेत्रात अमर्याद शक्यता आहेत. इथे प्रतिभा आहे आणि तंत्रज्ञान देखील आहे, तसेच नावीन्य आणि पायाभूत सुविधा देखील आहेत, असं मोदी म्हणाले आहेत.
Defence Expo 2020: दहशतवाद आणि सायबर साधनांचा दुरुपयोग हे जगासमोर मोठे आव्हान- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 4:44 PM
चार दिवसांचं डिफेन्स एक्स्पो उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सुरू झालं आहे.
ठळक मुद्देचार दिवसांचं डिफेन्स एक्स्पो उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सुरू झालं आहे. तप्रधान नरेंद्र मोदींनी बटण दाबून डिफेन्स एक्स्पो 2020चं उद्घाटन केलं आहे.या चार दिवसांच्या परिषदेत 70हून अधिक देशांतील 1028 संरक्षण उपकरणांच्या संबंधित कंपन्या आपल्या उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करत आहेत.