Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये विशिष्ट धर्माला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले. यामध्ये अनेक निष्पाप मारले गेले. देशवासीयांना आश्वस्त करतो की, सरकार सर्व आवश्यक ती सर्व पावले उचलेल. हा हल्ला केलेल्यांना तर शोधून काढूच, शिवाय या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे राहून ज्यांनी सूत्रे हलवली, अशा लोकांपर्यंतही पोहोचू. या हल्ल्यातील आरोपींनी लवकरच प्रत्युत्तर देऊ, अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. देशातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख आणि तीनही दलाचे प्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पहलगाम आणि संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीची माहिती संरक्षणमंत्र्यांना दिली. सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
अशा भ्याड हल्ल्यांनी भारतासारखा बलाढ्य देश घाबरणारा नाही
या अत्यंत अमानवी कृत्याने संपूर्ण देश अतिशय दु:खात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा सर्व कुटुंबांना माझ्या संवेदना व्यक्त करतो. भारताचे दहशतवादाविरुद्ध झीरो टॉलरन्सचे धोरण आहे. याची पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो. या भ्याड कृत्याविरुद्ध भारतातील प्रत्येक नागरिक एकवटलेला आहे. अशा भ्याड हल्ल्यांनी भारतासारखा बलाढ्य देश घाबरणारा नाही. असे उत्तर देऊ की जग लक्षात ठेवेल, असा निर्धार राजनाथ सिंह यांनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक पर्यटक जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, यापैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत.