नवी दिल्ली: पाकिस्तानबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे. कारण लवकरच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिले राफेल विमान दाखल होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातील तिसर्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून फ्रान्सचे अधिकारी 20 सप्टेंबरला भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनोआ आणि विविध संरक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिले राफेल विमान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
भारतीय वायुसेना 24 पायलट तयार करणार आहे जे राफेल विमान चालवू शकतील. तसेच हे सर्व वैमानिक तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करतील. पुढच्या वर्षी मे महिन्या पर्यत सर्व राफेल विमान फ्रान्स भारताकडे सोपविणार आहे.
भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सप्टेंबर 2016ला भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल विमान खरेदी करण्याचा करार झाला होता. या सर्व विमानांची किंमत 7.87 अब्ज यूरो ठरविण्यात आली होती.