नवी दिल्ली - पाकिस्तानच्या तावडीतून सहीसलामत सुटून शुक्रवारी रात्री भारतात दाखल झालेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी भेट घेतली. त्यावेळी सीतारमन यांच्यासोबत हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ हे उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-२१ चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर लष्कराच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. दुसरीकडे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही यासाठी प्रचंड दबाव येत होता. अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान हे भारतात दाखल झाले होते.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतली विंग कमांडर अभिनंदन यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 5:50 PM