लडाख- गलवान खोऱ्यातील चीन अन् भारतीय जवानांमधील रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपीन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणेही यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी लेहमध्ये दाखल झाले आहेत. राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्यावर आहेत. (Defence Minister Rajnath Singh leaves for Leh)दौर्याच्या पहिल्या दिवशी राजनाथ सिंह लडाखमध्ये असतील, तर शनिवारी ते जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरला जाणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या परिस्थितीत दोन आठवड्यांपूर्वी (3 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अचानक लडाख दौरा केल्यानं सर्वच आश्चर्यचकित झाले होते, तसेच लडाखमधूनच मोदींनी चीनला कडक संदेश दिला होता. चीनसोबत तणावानंतर संरक्षणमंत्र्यांचाही हा पहिलाच दौरा आहे. मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही भागांना भेटी देईन. सीमा भागात तैनात सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहे” असे ट्विट राजनाथ यांनी केले.
CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 8:56 AM