नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही तो हातपाय पसरू लागला आहे. देशात आतापर्यंत 15,712हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून 500हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सैन्य दलातील सर्व जवानांना आणि कर्मचाऱ्यांना रोजच्या रोज संपर्क डायरी अपडेट ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर त्यांचे सर्वप्रकारचे सामूहिक प्रशिक्षण कार्यक्रमही थांबवण्यात आले असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.
भारतात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरससंदर्भात राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्ध आहे. असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. देशात गेल्या 24 तासांत 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 1334 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
युद्ध स्थरावर सुरू आहे कोरोनाचा सामना -राजनाथ सिंह म्हणाले, भारत युद्ध स्थरावर कोरोनाचा सामना करत आहे. यासाठी सर्व सरकारी संस्था समन्वयाने काम करत आहेत. संवाद तत्र, पुरवठा साखळी व्यवस्थापन, वैद्यकीय सहाय्य आणि अभियांत्रिकी यात शस्त्र दलाचाही वापर केला जात आहे.
सौन्य दल सतर्क -सैन्य दलातील कोरोना संसर्गासंदर्भात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना संपर्क डायरी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सर्वप्रकारचे सामूहिक कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत. याशिवाय युद्धनौका आणि पाणबुड्या, जथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अवघड आहे, तेथे इतर सर्वप्रकारची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.