शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

बापरे! PUBG खेळण्यापासून रोखल्याने 5 मुलं घरातून पळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:58 PM

आई-वडिलांनी पबजी खेळण्यास विरोध केल्याने पाच शाळकरी मुलांनी घरातून पळ काढत थेट दिल्ली गाठल्याची घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्देआई-वडिलांनी पबजी खेळण्यास विरोध केल्याने पाच शाळकरी मुलांनी घरातून पळ काढत थेट दिल्ली गाठल्याची घटना समोर आली आहे.  पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यासाठी इतर राज्यांमध्ये आपली टीम पाठवली.तपासादरम्यान घरातून पळ काढलेल्य़ा पाचही मुलांचा शोध लागला.

देहरादून - सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. पबजी खेळण्यापासून रोखल्याने 5 मुलं घरातून पळाल्याची घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी पबजी खेळण्यास विरोध केल्याने पाच शाळकरी मुलांनी घरातून पळ काढत थेट दिल्ली गाठल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी देहरादून येथे राहणारे शमून राणा आणि डॅनियल यांची मुलं साहिल राणा आणि आशीष हे दोघेही शाळेत गेले होते. मात्र शाळा सुटल्यावर देखील ते घरी परतले नाहीत. मुलांच्या पालकांनी मुलं घरी परत न आल्याने पोलिसांत धाव घेत मुलं हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजपूर, कोठालगेट, कोल्हूखेत, रेल्वे स्टेशन आणि आयएसबीटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच हरवलेल्या मुलांचा फोटो असलेली काही पत्रकं देखील छापली. मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याच दरम्यान मुलांना असलेल्या पबजीच्या वेडाची माहिती पोलिसांना मिळाली. 

पोलिसांनी मुलांचे गेम आयडी शोधून ते सायबर सेलच्या माध्यमातून कंपनीला पाठवले. 22 जुलै रोजी सरफराज, शुभम आणि राहुल अशी नावं असलेली तीन मुलं शाळेतून घरी परतली नसल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यांना पबजी या खेळाबाबत माहिती मिळाली. घरातून पळून गेलेल्या मुलांना आई-वडील पबजी खेळण्यापासून रोखत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यासाठी इतर राज्यांमध्ये आपली टीम पाठवली. तपासादरम्यान घरातून पळ काढलेल्य़ा पाचही मुलांचा शोध लागला. पोलिसांनी मुलांची अधिक चौकशी केली असता मुलांनी पालकांनी पबजी खेळण्यापासून रोखल्यामुळे घरातून पळ काढल्याची माहिती दिली. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

धक्कादायक! आईने PUBG खेळण्यापासून रोखल्याने मुलाची आत्महत्या 

आईने पबजी खेळण्यापासून रोखलं म्हणून एका 17 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हरियाणातील जिंदमध्ये ही घटना  घडली. मुलाने दहावीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर तो घरीच होता. मात्र घरी असताना तो जास्त वेळ फोनमध्येच गुंतलेला असे. पबजी हा त्याच्या आवडीचा गेम असल्याने तो रात्री 12 वाजेपर्यंत हा गेम खेळत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. कित्येकदा नातेवाईकांनी मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने त्याकडे दुर्लक्ष केले. मुलगा नेहमीप्रमाणे त्याच्या खोलीत पबजी खेळत बसला होता. त्यावेळी त्याच्या आईने त्याला पबजी खेळण्यापासून रोखले. रागाच्या भरात मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले

पबजीमधला गेमिंग पार्टनर आवडला; महिलेनं पतीकडे घटस्फोट मागितलापबजीमुळे नात्यात दुरावा निर्माण होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यानंतर आता पबजीमुळे एका महिलेनं पतीकडून घटस्फोट मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गेमिंग पार्टनर आवडल्यानं एका मुलाची आई असलेल्या महिलेनं घटस्फोटाची मागणी केली. यासाठी तिनं महिला हेल्पलाईनशी संपर्क साधून मदतदेखील मागितली. सध्या ही महिला पतीचं घरी सोडून माहेरी राहते. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पबजीमुळे एक संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. पबजीमधला पार्टनर आवडल्यानं घटस्फोट घ्यायचा आहे. त्यासाठी मदत करा, असा फोन महिला हेल्पलाइनमध्ये (181) काम करत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला आला. फोन करणारी महिला एका प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्याची माहिती अधिकारी महिलेनं दिली. कौटुंबिक वादामुळे नव्हे, तर पबजीमधील पार्टनरसोबत राहण्याची इच्छा असल्यानं घटस्फोट हवा असल्याचं महिलेनं हेल्पलाईनला सांगितलं. 

 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमdelhiदिल्लीPoliceपोलिस