विशाखापट्टणम - सध्या देशभरात नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणी देवीच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून तिची भक्तिभावाने सेवा केली जात आहे. अनेक ठिकाणी देवीच्या आराशीसाठी भव्य मंडप आणि नयनरम्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशमधील असाच एक मंडप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममधील देवीच्या मूर्तीची आरास सध्या चर्चेत आहे. या मूर्तीची आरास करण्यासाठी तब्बल चार किलो सोने आणि दोन कोटी रूपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री कन्यका परमेश्वरी मंदिरात दुर्गाष्टमीनिमित्त देवीची मूर्ती आणि मंदिरातील गाभाऱ्याची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सजावट करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करण्यात आला आहे. तसेच या सजावटीसाठी सुमारे चार किलो सोन्याचाही वापर कण्यात आला आहे. नोटांची माळ बनवून ती मूर्तीच्या चारी बाजूंनी फिरवण्यात आली आहे.
दोन कोटीच्या नोटा आणि 4 किलो सोन्याने मढवून केली देवीची आरास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 12:28 PM