प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसह राहुल गांधी उद्या काश्मीरला जाणार; काश्मिरी लोकांशी साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 08:47 PM2019-08-23T20:47:24+5:302019-08-23T20:49:03+5:30

जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर राहुल गांधी तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

A delegation of Opposition party leaders to visit SRINAGAR tomorrow with Congress leaders Rahul Gandhi, | प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसह राहुल गांधी उद्या काश्मीरला जाणार; काश्मिरी लोकांशी साधणार संवाद

प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसह राहुल गांधी उद्या काश्मीरला जाणार; काश्मिरी लोकांशी साधणार संवाद

googlenewsNext

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल यांच्यासोबत विरोधी पक्षातील 9 नेतेही सोबत असणार आहे. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर राहुल गांधी तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्याचसोबत स्थानिक नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांशीही राहुल गांधी भेट देणार आहेत. यापूर्वी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. 

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीकेचं लक्ष्य केलेलं असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असं आवाहन केलं होतं त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असं त्यांनी म्हटलं होतं. 

तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिलं होतं.
यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी ट्विट करत मी विना अट काश्मीरातील लोकांना भेटण्यासाठी तयार आहे. मी कधी आणि केव्हा यायचं? असं त्यांनी म्हटलं होतं. 
 

Web Title: A delegation of Opposition party leaders to visit SRINAGAR tomorrow with Congress leaders Rahul Gandhi,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.