'पोस्ट डिलीट करा, हा इशारा ...', रोहित शर्माच्या फिटनेसबाबत बोलणाऱ्या शमा मोहम्मद यांना काँग्रेसने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:51 IST2025-03-03T14:42:09+5:302025-03-03T14:51:58+5:30
Rohit Sharma Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. काल भारताने न्यूझिलंडचा पराभव केला. दुसरीकडे काल कर्णधार रोहित शर्मा याच्यावर काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी टीका केली. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

'पोस्ट डिलीट करा, हा इशारा ...', रोहित शर्माच्या फिटनेसबाबत बोलणाऱ्या शमा मोहम्मद यांना काँग्रेसने फटकारले
काँग्रेस प्रवक्ता शमा मोहम्मद यांनी भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा याच्याबाबत एक विधान केले होते. या विधानामुळे आता शमा मोहम्मद वादात सापडल्या आहेत. या विधानावरुन आता काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली आहे. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर भाष्य केले आहे.
Video: रोहितबद्दल मला जे वाटलं ते मी बोलले; त्यात चूक काय? शमा मोहम्मद यांनी धोनी-विराटलाही यात ओढलं
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद म्हणाल्या की, एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तसेच त्यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले. शमा मोहम्मदने रोहितच्या कर्णधारपदाला अप्रभावी म्हटले आहे. या मुद्द्यावरुन आता भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
काँग्रेसने कारवाई केली
काँग्रेसने शमा मोहम्मद यांच्या विधानापासून फटकारले आहे. काँग्रेसचे मीडिया प्रभारी आणि प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एका दिग्गज क्रिकेटपटूबद्दल काही विधाने केली आहेत जी पक्षाच्या भूमिकेशी जुळत नाहीत. त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ते ट्विट डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे आणि भविष्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पवन खेरा म्हणाले की, काँग्रेस पक्ष क्रीडा जगतात खेळाडूंच्या योगदानाला खूप महत्त्व देतो आणि त्यांच्या प्रतिमेवर परिणाम करू शकेल अशा कोणत्याही वक्तव्याचे समर्थन करत नाही.
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. शमा मोहम्मद द्वारा क्रिकेट के एक दिग्गज खिलाड़ी पर की गई टिप्पणियाँ, पार्टी के आधिकारिक दृष्टिकोण का प्रतिनिधित्व नहीं करती है।
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) March 3, 2025
उन्हें एक्स से संबंधित सोशल मीडिया पोस्ट हटाने का निर्देश दिया गया है और भविष्य में अधिक सतर्क…