नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या विकासावर नेहमीच चर्चा रंगतात. त्यापाठोपाठ महिलांना मेट्रोचा प्रवास मोफत यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार चांगलेच चर्चेत आले होते. आता आम आदमी पक्षाने दिल्लीत विद्यार्थ्यांसाठी मोठी योजना आणली आहे. यानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी घोषणा केली की, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या फिसची १०० टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थीकडून जेवढी फिस शाळेत दिली जाईल, तेवढीच फिस शिष्यवृत्तीच्या रुपाने परत मिळणार आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचं वर्षीक उत्पन्न एक लाखांपासून अडिच लाख रुपयापर्यंत आहे, त्या विद्यार्थ्यांना शालेय फिसच्या ५० टक्के शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न अडिच लाख ते सहा लाख रुपये आहे, त्या विद्यार्थ्यांना फिसच्या २५ टक्के रक्कम मिळणार आहे.
दिल्लीत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचा निकाल तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक होत आहे.