नवी दिल्ली : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची (आयजीआय) क्षमता वाढविण्याची तयारी सुरूआहे. पुढील ३ वर्षांमध्ये याची तयारी केली जाईल. त्यानंतर दरवर्षी १० कोटी प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे.‘दिल्ली इंटरनॅशनल एयरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड तथा ‘डायल’ने याबाबत काम सुरू केले आहे. सध्या या विमानतळाची क्षमता ६ ते ७ कोटी असून ‘डायल’ आगामी ३ वर्षांमध्ये ९ हजार कोटींची गुंतवणूक करेल. २०२० पर्यंत या विमानतळाचा वापर करणाऱ्यांची संख्या ८ कोटींपर्यंत पोहोचेल. क्षमता वाढल्यास ‘आयजीआय’ लंडनच्या हिथ्रो विमानतळास मागे टाकण्याची शक्यता आहे. डायल कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, ३७ महिन्यांमध्ये खूप मोठी क्षमता असलेला विमानतळ उभारणे अशक्य होते.
हिथ्रोला मागे टाकणार दिल्ली विमानतळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 4:24 AM