ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली , दि. २९ - दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानातून किरणोत्सारी पदार्थाची (रेडिओअॅक्टिव्ह मटेरियल) गळती झाल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. शुक्रवारी सकाळी विमानतळावरील प्रवाशांच्या डोळ्यांतून अचनाक पाणी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली.
फोर्टीस हॉस्पिटलसाठी टर्कीहून मागवलेल्या गॅमा किरणांचा उत्सर्ग झाल्याचे उघड झाले असून ती गलती रोखण्यात यश मिळाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढून तो परिसर सील करण्यात आला आणि एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही गळती रोखून परिस्थिती नियंत्रणात आणली.