नवी दिल्लीः दिल्लीच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीर मोदींनी दिल्लीतल्या द्वारिकामध्ये निवडणुकीची रॅली केली आहे. दिल्लीची ही निवडणूक या दशकातली पहिली निवडणूक आहे. हे दशक भारताचं दशक होणार आहे. भारताची प्रगती ही आज घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असणार आहे. दिल्ली आणि देशाच्या हितासाठी आपण एकत्र उभं राहिलं पाहिजे, असं म्हणत मोदींनी दिल्लीतल्या आपच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.दिल्लीत दोष देणारं नव्हे, तर दिशा देणारं सरकार हवं. सौभाग्य योजनेतून ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वीज कनेक्शन दिले'' ज्यांच्या हृदयाला गरिबीचं दुःख काय असतं हे माहीत आहे, ते लोक गरिबांना सरकारी योजनांपासून वंचित कसे ठेवू शकतात. दिल्लीत सबका साथ, सबका विकासवर विश्वास असणार सरकार हवं. दिल्ली आणि देशाच्या हितासाठी एकत्र येऊन ताकद उभी करण्याची गरज आहे, असंही मोदी म्हणाले आहे.
"सौभाग्य योजनेतून ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वीज कनेक्शन दिले"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 6:04 PM