दिल्ली विधानसभा निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. नेतेमंडळींचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप चांगलेच तीव्र होताना दिसत आहेत. यातच आज केंद्रीय गृह मंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी युमान नदी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. "आज अरविंद केजरीवाल यांचा पुतळा यमुनेत बुडवून काढला (डुबकी लगावली), तर तोही आजारी पडला," असे शाह यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, आज नवी दिल्लीचे भाजप उमेदवार प्रवेश वर्मा अरविंद केजरीवाल यांचे कटआऊट घेऊन यमुना नदीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी कटआऊटलाला यमुनेत बुडवून काढले (डुबकी लगावली). या कटआऊटवर ‘सॉरी मैं फेल हो गया’, असे लिहिण्यात आले होते. अमित शाह यांनी सभेला संबोधित करताना, याच प्रसंगावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
पुढील तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे भाजपचे आश्वासन - खरेतर, भाजप यमुना नदी स्वच्छतेच्या मुद्द्यावर जोर देत, आप सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहे. याशिवाय, आपण यमुना नदी स्वच्छ करू शकलो नाही, हे खुद्द अरविंद केजरीवाल यांनीही मान्य केले आहे. तसेच, पुन्हा सत्तेत आल्यास यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले आहे. याच बरोबर, भाजपनेही पुढील तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन दिल्लीकरांना दिले आहे.
अण्णांचे नाव घेत केजरीवालांवर हल्लाबोल - सभेला संबोधित करताना अमित शहा पुढे म्हणाले, केजरीवाल यांनी सुशासन हा शब्दच संपवला आहे. निवासी भागातील दारूची दुकाने बंद करू, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, मंदिरे आणि गुरुद्वारांजवळ दारूची दुकाने उघडून त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला. बनावट मोहल्ला क्लिनिक उघडले, ऑपरेशन्स आणि एमआरआयसाठी कुठे जायचे? सत्तेवर आल्यास, १० लाख रुपयांपर्यंतचा उपचार भाजप सरकार करेल." एवढेच नाही तर," आपण दिल्लीतील भ्रष्टाचार संपवू", अशी घोषणाही त्यांनी केली होती. आज अन्नांनाही वाईट वाटत असेल की, आपला एक चेला कसा निघाला, ज्याने एवढा भ्रष्टचार केला.