300 युनिट मोफत वीज, महिलांना महिना ₹ 2100 अन्...भाजप करणार मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:21 IST2025-01-09T17:21:00+5:302025-01-09T17:21:23+5:30

Delhi Assembly Elections 2025: आम आदमी पक्षाच्या आश्वासनांना टक्कर देण्यासाठी BJP देखील अशाच प्रकारच्या योजना काढणार आहेत.

Delhi Assembly Elections 2025: 300 units of free electricity, ₹ 2100 per month for women and...BJP to make big announcements | 300 युनिट मोफत वीज, महिलांना महिना ₹ 2100 अन्...भाजप करणार मोठ्या घोषणा

300 युनिट मोफत वीज, महिलांना महिना ₹ 2100 अन्...भाजप करणार मोठ्या घोषणा

Delhi Assembly Elections 2025:दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्व राजकीय पक्षांनी आपला प्रचार सुरू केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रलोभने/आश्वासने दिली जात आहेत. एकीकडे आम आदमी पक्षाने मोफत वीज, मोफत शाळा, मोफत उपचार अशाप्रकारची विविध आश्वासने दिली आहेत. तर, दुसरीकडे भारतीय जनता पक्षदेखील दिल्लीतील मतदारांना अशाच प्रकारची आश्वासने देण्याच्या तयारीत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप दिल्लीसाठी आपला जाहीरनामा तयार करत असून, लवकरच प्रसिद्ध केला जाईल. हा जारीरनामा तयार करणाऱ्या समितीसमोर भाजपच्या काही नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या योजनांना आव्हान देण्यासाठी घरांसाठी 300 युनिट आणि मंदिर-गुरुद्वारांसाठी 500 युनिट मोफत वीज देण्याची सूचना केली आहे. याशिवाय, लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर 2500 रुपये दिले जाऊ शकतात. याबाबतचा अंतिम निर्णय जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि भाजप हायकमांडला घ्यायचा आहे.

आपची आश्वासने
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार मतदारांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज आणि 20 हजार लिटर पाणी देणार आहे. याशिवाय, अरविंद केजरीवालांनी निवडणुकीच्या घोषणेपूर्वी महिलांना प्रति महिना 2100 रुपये देण्याची घोषणाही केली आहे. यासाठी नोंदणीही सुरू केली आहे. 

भाजपही त्याच मार्गावर 
'आप'ला टक्कर देण्यासाठी भाजपही मोठी पावले उचलू शकते. यावेळच्या जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली जाऊ शकतात, असे मानले जात आहे. 'आप'च्या वीज-पाणी योजनेला टक्कर देण्यासाठी भाजपदेखील अशाच प्रकारच्या मोफत योजना देण्याची शक्यता आहे. 

Web Title: Delhi Assembly Elections 2025: 300 units of free electricity, ₹ 2100 per month for women and...BJP to make big announcements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.