ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १४ - अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणा-या "आप"च्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांना केजरीवाल यांच्या विरूध्द निवडणुकीत उभा करण्याचा विचार भाजपाकडून करण्यात येत असल्याची विश्वसनिय माहिती समोर येत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्यापासून दिल्लीत ख-या अर्थाने रणधुमाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान, शाजिया इल्मी यांना भाजपाच्या तिकीटावर केजरीवाल यांच्याविरूध्द उभे करण्यात येणार आहे की नाही हे अद्याप भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती आरोप करून शाजिया इल्मी यांनी गेल्यावर्षी आम आदमी पार्टीचा राजीनामा दिला होता. शाजिया इल्मी यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता. शाजिया यांनी आम आदमी पक्षाकडून २०१३ साली झालेली दिल्ली विधानसभा निवडणूक होती परंतू त्यांना भाजपाच्या अनील शर्मा यांच्याकडून अवघ्या ३२६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत गाझियाबादमधून उभ्या राहिलेल्या शाजिया इल्मी यांना भाजपाचे उमेदवार माजी सैन्यप्रमूख व्ही.के. सिंग यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता.
दिल्ली विधानसभा : केजरीवाल विरूध्द शाजिया इल्मी?
By admin | Published: January 14, 2015 4:16 PM