नवी दिल्ली : दिल्लीतील सिग्नेचर पुलाचे आज उद्धाटन होणार आहे. सिग्नेचर पुलाचे उद्धाटन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते होणार आहे. मात्र. या उद्धाटनाआधीच भाजपा आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समजते.
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी आपल्या समर्थकांसह सिग्नेचर पुलाच्या उद्घाटनस्थळी दाखल झाले. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर भाजपा आणि आपचे कार्यकर्ते परस्पर भिडले. यावेळी मनोज तिवारी म्हणाले की, सिग्नेचर पुलाच्या कामाला दुसऱ्यांदा मी सुरुवात केली होती. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी पुलाच्या उद्धाटनाचे आयोजन करत आहेत.
खासदार असल्यामुळे मी सिग्नेचर पुलावर आले आहे. पुलाच्या उद्धाटन कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. मी येथील खासदार आहे, तर समस्या काय आहे? मी गुन्हेगार आहे काय? या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करण्यासाठी आलो आहे, असे मनोज तिवारी म्हणाले.
सिग्नेचर पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 14 वर्षे लागली. तसेच, जवळपास 1500 कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन लिफ्ट बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे. लिफ्टच्या आधारे लोक 154 मीटर उंचावर जाऊन संपूर्ण दिल्ली पाहू शकणार आहेत.