दिल्ली मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून आम आदमी पार्टीवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. एकीकडे दिल्ली भाजपा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, तर दुसरीकडे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत निषेधही करत आहे. दिल्ली भाजपाने राजधानीच्या सर्व 256 वॉर्डमध्ये होळी करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन केले.
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली कॅनॉट प्लेसमध्ये भ्रष्टाचाराची होळी आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. विधानसभेत एलओपी रामवीर सिंह बिधुरी यांनी महिपालपूरमध्ये तर खासदार मनोज तिवारी यांनी नथुपूरमध्ये निषेध केला. यावेळी वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, आता वेळ आली आहे की आम आदमी पक्षातील प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश करायची.
दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. वीरेंद्र सचदेवा म्हणाले, "होळीचा संदेश म्हणजे वाईटाचं दहन आणि चांगल्याचा विजय आणि दिल्लीतील सर्वात मोठे वाईट म्हणजे भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांचं काम शहराचा विकास करणे आहे, मात्र अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी लुटण्याचं काम केलं."
"दिल्लीतील मंदिर असो, शाळा असो, गुरुद्वारा असो किंवा मुख्य बाजार असो, अशी एकही जागा नाही जिथे अरविंद केजरीवाल यांनी दारूची दुकाने उघडली नाहीत. केजरीवाल यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी आधीच राजीनामा दिला असता. आपच्या प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश केला पाहिजे जेणेकरून त्यांचा खरा चेहरा दिल्लीच्या जनतेसमोर येईल" असं देखील वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे.