शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

Delhi Budget 2022 Highlights: २० लाख नोकऱ्या, नाइट लाइफ, नवं मार्केट! बजेटमध्ये केजरीवाल सरकारचं दिल्लीला बदलण्याचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 3:25 PM

दिल्ली सरकारनं 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

नवी दिल्ली-

दिल्ली सरकारनं 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात, दिल्लीतील आप सरकारचं लक्ष रोजगार, आरोग्य, नाइट लाइफ, मार्केट, हरित ऊर्जा, रिटेल क्षेत्रावर आहे. तब्बल ७५,८०० कोटींच्या या अर्थसंकल्पात दिल्ली सरकारनं पुढील ५ वर्षांत २० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. दिल्ली सरकार नोकऱ्यांमध्ये ग्रीन जॉबवर भर देत आहे.

अर्थसंकल्प सादर करताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, आप सरकारचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. दिल्लीत ७ वर्षात क्रांतिकारी काम झालं आहे. गेल्या वर्षी आप सरकारनं देशभक्तीपर अर्थसंकल्प सादर केला होता, यावेळी आमचा अर्थसंकल्प रोजगाराचा अर्थसंकल्प आहे. येत्या पाच वर्षांत दिल्लीतील लोकांना २० लाख नोकऱ्या देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. पुढील ५ वर्षांत किरकोळ क्षेत्रात ३ लाख नोकऱ्या आणि पुढील १ वर्षात १.२० लाखांहून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. मनीष सिसोदिया म्हणाले की, १.५ लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी दिल्लीच्या ५ प्रसिद्ध बाजारपेठांचा विकास केला जाईल. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचा हिस्सा २०११-१२ मधील ३.९४ टक्क्यांवरून २०२१-२२ मध्ये ४.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्ली अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये नगरपालिका संस्थांसाठी ६,१५४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ते म्हणाले की, एम्प्लॉयमेंट मार्केट पोर्टल २.० दिल्लीत आणले जाईल. याआधीच्या फेऱ्यांमध्ये नोकऱ्या मागणारे १५ लाख आणि नोकऱ्या देणारे १० लाख लोक पुढे आले होते. या माध्यमातून दरवर्षी एक लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

शिक्षण बजेट- १६,२७८ कोटी रुपयेआरोग्य- ९६६९ कोटी रुपयेपरिवहन- ९५३९ कोटी रुपये

नाइट लाइफवर लक्षमनीष सिसोदिया यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार दिल्ली हे आगामी काळात फूड हब ओळखले जाणार आहे. नवीन फूड ट्रक पॉलिसी आणली जाणार आहे. रात्री ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत फूड ट्रक बसवता येतील. यामुळे दिल्लीतील नाइट लाईफ वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सरकार दिल्लीतील प्रमुख फूड हब ओळखून त्यांचा पुनर्विकास करेल.

क्लाउड किचनची संख्या दरवर्षी २० टक्क्यांनी वाढत आहे, सध्या २० हजारापेक्षा जास्त क्लाउड किचन आहेत आणि दोन लाखांहून अधिक लोकांना रोजगार आहे. हे रात्रीच्या अर्थव्यवस्थेला देखील समर्थन देते. क्लाउड किचनसाठी जागा सहजपणे उपलब्ध करुन देणे आणि परवाना देण्याची योजना आणली आहे. क्लाउड किचन उद्योग येत्या ५ वर्षात ४२,००० लोकांना रोजगार देईल. किरकोळ आणि खाद्य पेय क्षेत्र दरवर्षी २५ टक्के दरानं वाढत आहे.

गांधीनगर बनणार मोठं मार्केटयाशिवाय दिल्ली सरकार स्टार्टअप धोरण आणत आहे. या नवीन धोरणानुसार, नोकरी शोधणाऱ्या लोकसंख्येचं रूपांतर नोकरी देणाऱ्या लोकसंख्येमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय दिल्लीत नवीन इलेक्ट्रॉनिक शहर स्थापन करण्यात येणार आहे. दिल्लीत होलसेलसाठी फेस्टिव्हल आयोजित करणार असून, गांधी नगर मार्केट कपड्यांचे नवे हब बनणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय दिल्लीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही आयोजित केला जाणार आहे.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली