Delhi: सध्या राजधानी दिल्लीतील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जात आहे. या कारवाईला स्थानिकांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागतोय. काल एमसीडीचे बुलडोझर आज दक्षिण दिल्लीतील शाहीनबागमध्ये पोहोचला होते, परंतु स्थानिक लोक आणि आमदारांनी कारवाईला विरोध करत त्याला रोखले. पण, 13 मेपर्यंत दिल्लीतील विविध भागात कारवाई सुरुच राहणार आहे.
याच क्रमाने उत्तर दिल्लीतील मंगोलपुरीच्या वाय ब्लॉकमध्ये आज कारवाई होणार आहे. या परिसरात दोन मंदिरे असून आजूबाजूला एक मशीदही आहे. या परिसरात अनेक लहान दुकानेदेखील होती. पण, कारवाईच्या भीतीने काल रात्रीच अनेकांनी स्वतःहून त्यांची दुकाने हटवल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत.
पोलिसांची परिसरात नाकाबंदी मंगोलपुरीच्या वाय ब्लॉकमध्ये स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. आता काही वेळात दिल्ली पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचणार असून, बॅरिकेड्सच्या साहाय्याने स्थानिक पोलिसांनी काही रस्त्यांवरील वाहतूक रोखली आहे. सीआरपीएफची टीम रस्त्यावर उतरली आहे.
ड्रोनच्या सहाय्याने परिसरावर नजर मंगोलपुरीच्या वाय ब्लॉकमध्ये ड्रोनच्या मदतीने हवाई पाळत ठेवली जात आहे. दिल्ली पोलिसांची एक टीम वाय ब्लॉकमधील घरांच्या छतावरही बारकाईने लक्ष ठेवून आहे. या परिसरात दोन मंदिरे आणि एक मशीद असल्याने हा परिसरही अतिशय संवेदनशील बनला आहे. MCD कारवाई काही तासांत सुरू होऊ शकते.