नवी दिल्ली:दिल्ली कॅबिनेट (Delhi Cabinet) ने मंगळवारी आमदारांच्या वेतन आणि इतर भत्यांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यानुसार, आता दिल्लीतील आमदारांना 30 हजार रुपये प्रति महीना बेसिक वेतन मिळेल. सध्या दिल्लीतील आमदारांचे वेतन 12 हजार रुपये आहे.
90 हजार होणार पगारदिल्ली कॅबिनेटने मंगळवारी मंजुर केलेल्या प्रस्तावानुसार, आमदारांचे वेतन आणि इतर भत्ते मिळून त्यांना महिन्याकाठी 90 हजार रुपये मिलणार आहेत. सध्या दिल्लीतील आमदारांचे वेतन आणि भत्ता 54 हजार रुपये प्रति महीना आहे. कॅबिनेटने मंजुर केलेल्या भत्त्यानुसार, आता आमदारांना बेसिक सॅलरी 30,000 रुपये, मतदारसंघ भत्ता- 25,000 रुपये, सचिवालय भत्ता- 15,000 रुपये, वाहन भत्ता- 10,000 रुपये आणि टेलीफोन- 10,000 रुपये मिळेल.
सर्वात कमी पगार दिल्लीतील आमदारांचीदिल्ली सरकार सरकारच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, दिल्लीतील आमदारांची पगार इतर राज्यातील आमदारांच्या पगारापेक्षा कमी आहे. अनेक भाजपा, काँग्रेस आणि स्थानिक पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमधील आमदारांची पगार दिल्लीतील आमदारांच्या पगारापेक्षा खूप जास्त आहे. पण, आता दिल्ली सरकारने पगार वाढीचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर आमदारांना काहीचा दिलासा मिळणार आहे.