Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 08:43 AM2020-02-16T08:43:44+5:302020-02-16T08:57:53+5:30
दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही. भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी आज (16 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर होणार आहे. आप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केजरीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच स्तरातून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन होत आहे.
केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी याच मैदानावर केले होते. त्यामुळे येथे शपथविधी सोहळा दिल्लीकरांच्या साक्षीने होणार आहे. केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं गेलेलं नाही. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे.
Delhi: Chief Minister-designate Arvind Kejriwal to swear-in as Chief Minister for the third time at Ramlila Ground today. (File pic) pic.twitter.com/vttl35li9F
— ANI (@ANI) February 16, 2020
'दिल्लीकरांनो... तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या' असं निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य दिल्लीकरांना ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून केलं आहे. 'जेव्हा भारतमातेच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. भारताच्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळतील. सुरक्षा व सन्मान महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करेल. युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचे मूल्य मिळेल. प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा मिळतील. धर्म, जात सोडून प्रत्येक भारतवासी भारताला पुढे घेऊन जाईल तेव्हाच अमर तिरंगा आकाशात अभिमानाने फडकेल. तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी सहा वाजेपर्यंत जरुर या' असं निमंत्रण केजरीवालांनी व्हिडीओतून दिलं आहे.
Delhi: Preparations underway for the swearing-in ceremony of Chief Minister-designate Arvind Kejriwal at Ramlila Ground. He will take oath as CM for the third time today. pic.twitter.com/QbyMhGkBwZ
— ANI (@ANI) February 16, 2020
रामलीला मैदानावर भव्य संख्येने सामान्य नागरिकांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे. दिल्लीतील जनतेने आपला विजय मिळवून दिला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करता येईल. हा सोहळा सर्वांसाठी खुला राहणार असल्याची माहिती गोपळ राय यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपने या सोहण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
‘आप’ने राष्ट्रीय, प्रादेशिक पातळीवर आशावाद निर्माण केला आहे
‘आप’ची वैचारिक भूमिका त्यांच्या पाच वर्षांतील कामगिरीमधून घडविली गेली. ‘आप’ने शाळा, रस्ते, वीज अशी विकासोन्मुख भूमिका घेतली होती. याबरोबर निवडणूक काळात त्यांनी नेतृत्वापेक्षा विकास हा विचार मध्यवर्ती ठेवला. ‘आप’ने धार्मिक अंतराय हा मुद्दा बाजूला ठेवला. यामुळे ही सर्व राजकीय प्रक्रिया सामाजिक न्यायाच्या चौकटीत ‘आप’ने घडवून आणली, असा युक्तिवाद केला जातो. यामध्ये तथ्य आहे. त्यामुळे भाजपला त्यांचे डावपेच बदलण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी मोदींचे नेतृत्व आणि विधानसभेसाठी केजरीवालांचे नेतृत्व हा नेतृत्वकेंद्री विचार होता. या दोन्ही नेतृत्वांमध्ये फरक आहे. केजरीवाल विकासाधारित आणि मोदी हिंदुत्वाधारित राजकारण घडवीत आहेत. अशा दोन भिन्न टोकांच्या राजकारणाचे समर्थन दिल्लीमध्ये केले गेले.
महत्त्वाच्या बातम्या
'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'
राज्यात लवकरच शेतीसाठी पाणी महागणार, उद्योजकांनाही फटका
दूरसंचार कंपन्यांमुळे बँकांपुढेही संकट
भाजपला युपी, बिहारमधील सत्ता गमवावी लागेल- आझमी