शहरं
Join us  
Trending Stories
1
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
2
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
3
PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका
4
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
5
IND vs ZIM Live : वडिलांसाठी भावनिक क्षण! लेक रियान परागला पदार्पणाची सोपवताना 'बाप'माणूस भारावला
6
मुंबईत १ कोटीचा फ्लॅट, ऑडी कार, असा पकडला गेला करोडपती चोर, लाईफस्टाईल पाहून पोलीसही अवाक्
7
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
8
ना हॉटस्टार, ना Jio Cinema! India vs Zimbabwe Live मॅच कुठे पाहायची? वाचा सविस्तर
9
IND vs ZIM Live : WHAT A BALL! मुकेश कुमारने पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा; फलंदाज चीतपट
10
जिओचा ग्राहकांना दुसरा धक्का! आधी किंमती वाढवल्या, आता Jio'ने 'हे' OTT वाले प्लॅनही केले बंद
11
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
12
Ramayan: वनवासात चौदा वर्षं न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली? वाचा!
13
"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 
14
IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज
15
Anant-Radhika Wedding : 'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video
16
टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार
17
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
18
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
19
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
20
टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ

अरविंद केजरीवाल आज तिहार तुरुंगातून बाहेर येणार? 'या' अटींचे पालन करावे लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 9:34 AM

Arvind Kejriwal : गुरुवारी विशेष न्यायाधीश निया बिंदू यांनी अरविंद केजरीवाल यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिलासा दिला.

नवी दिल्ली : : मद्य धोरण प्रकरणी उ‌द्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. या आदेशाला ४८ तासांसाठी स्थगिती देण्याची सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) विनंतीही न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे शुक्रवारी म्हणजेच आज अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. 

गुरुवारी विशेष न्यायाधीश निया बिंदू यांनी अरविंद केजरीवाल यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिलासा दिला. अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामिनासाठीच्या अर्जावर फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हा आदेश दिला. तसेच, अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना न्यायालयाने त्यांच्यावर अनेक अटीही घातल्या आहेत. यामध्ये ते तपासात अडथळा आणण्याचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. तसेच, विशेष न्यायाधीशांनी अरविंद केजरीवाल यांना आवश्यक असेल, तेव्हा न्यायालयात हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

अरविंद केजरीवाल आज तिहार तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता असल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर आपने म्हटले होते की, सत्याला त्रास दिला शकतो, पराभव होऊ शकत नाही. दरम्यान, तिहार तुरुंग प्रशासनाला न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी दुपारपर्यंत सुटका होऊ शकते. 

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तिहार प्रशासनाला जामीन आदेश मिळालेला नव्हता. तुरुंगाच्या नियमांनुसार, न्यायालयाने आदेश दिल्यावर न्यायालयाचे कर्मचारी ते तिहार मुख्यालयात आणतात आणि केंद्रीय जनसंपर्क कार्यालयाकडे सोपवतात. ही सर्व कागदपत्रे आज पूर्ण होणार आहेत. यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद  केजरीवाल नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली