शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

२४८ कोटींच्या संपत्तीचे मालक मनजिंदर सिंग सिरसा बनले दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:03 IST

Delhi CM Oath Ceremony : रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 

Delhi CM Oath Ceremony : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. यानंतर आज दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी पार पडला. रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 

या मंत्र्यांमध्ये मनजिंदर सिंग सिरसा यांचाही समावेश आहे. मनजिंदर सिंग सिरसा हे मंत्री होण्यामागे अनेक राजकीय कारणे असल्याचे म्हटले जात आहे. मनजिंदर सिंग सिरसा यांनी राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघातून भाजपमधून पहिल्यांदाच दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, याआधी ते अकाली दलाच्या तिकिटावर दोनदा आमदारही राहिले आहेत. 

याचबरोबर,  मनजिंदर सिंग सिरसा हे २०१३ आणि २०१७ मध्ये दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही होते. २०२१ मध्ये त्यांनी शिरोमणी अकाली दल सोडले आणि भाजपमध्ये सामील झाले. यानंतर, ऑगस्ट २०२३ मध्ये, त्यांची भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनजिंदर सिंग सिरसा यांनी आम आदमी पक्षाच्या विद्यमान आमदार धनवती चंडेला यांचा १८,१९० मतांनी पराभव केला.

मनजिंदर सिंग सिरसा यांची संपत्ती किती?मनजिंदर सिंग सिरसा यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, मनजिंदर सिंग सिरसा यांची एकूण संपत्ती २४८.९ कोटी रुपये आहे. तसेच, त्यांचे शिक्षण फक्त बारावीपर्यंतच झाले आहे. परंतु राजकारणात त्यांची पकड खूप मजबूत मानली जाते.

भाजपने मंत्री का बनवले?दरम्यान, मनजिंदर सिंग सिरसा यांना मंत्री करून भाजपने शीख समुदायाला आकर्षित करण्याची रणनीती आखली आहे. मनजिंदर सिंग सिरसा हे दिल्लीतील भाजपच्या प्रमुख शीख चेहऱ्यांपैकी एक आहेत. तसेच, शेतकरी आंदोलनानंतर पंजाबमध्ये भाजपची स्थिती कमकुवत झाली होती. अशा परिस्थितीत, २०२७ च्या पंजाब निवडणुका लक्षात घेऊन भाजपने मनजिंदर सिंग सिरसा यांना दिल्ली सरकारमध्ये मंत्री केले आहे, जेणेकरून शीख समुदायात भाजपला आपली पकड मजबूत करता येईल.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूक