काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 10:34 AM2024-04-28T10:34:17+5:302024-04-28T11:06:51+5:30
Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीकाँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्याशी मतभेद झाल्याने अरविंदर सिंग लवली यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे अरविंदर सिंग लवली यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. यामध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, काँग्रेसवर खोटे, बनावट आणि दुर्भावनापूर्ण भ्रष्टाचाराचे आरोप करण्याच्या एकमेव आधारावर स्थापन झालेल्या पक्षासोबत आघाडी करण्याच्या विरोधात दिल्ली काँग्रेस युनिट होती. असे असतानाही पक्षाने दिल्लीत 'आप'सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला.
Arvinder Singh Lovely resigns from the position of Delhi Congress president.
— ANI (@ANI) April 28, 2024
"The Delhi Congress Unit was against an alliance with a Party which was formed on the sole basis of leveling false, fabricated and malafide corruption charges against the Congress Party. Despite that,… https://t.co/Y1A360fuutpic.twitter.com/hLP9RtnzUE
याचबरोबर, अरविंदर सिंग लवली यांनी स्वतःला दिल्ली पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. तसेच, दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांनी काँग्रसचे आभार व्यक्त करत गेल्या 7-8 महिन्यांत दिल्लीत पक्षाची पुनर्स्थापना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, जेणेकरून पक्ष पूर्वीच्या स्थितीत परत यावा, असे अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये जेव्हा आपल्याकडे कार्यभार सोपवण्यात आला तेव्हा पक्षाच्या युनिटची स्थिती सर्वांना माहीत आहे. तेव्हापासून विविध उपाययोजना करून पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पुन्हा उत्साही करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे अरविंदर सिंग लवली यांनी म्हटले आहे. तसेच, पक्ष सोडून गेलेल्या किंवा निष्क्रिय झालेल्या शेकडो स्थानिक कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना पक्षात पुन्हा सामील करून घेतले, असेही अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.