नवी दिल्ली-देहरादून शताब्दी ट्रेनच्या एका कोचला आज भीषण आग लागली. आग लागल्याचा प्रकार लक्षात येताच त्वरीत ट्रेन थांबवण्यात आली आणि हा कोच ट्रेनपासून वेगळी करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. आगीची माहिती मिळताच एडीआरएन एन.एन. सिंह आणि अन्य रेल्वेचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोगोचले.नवी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या सी ४ या कोचला आग लागली. लोकोपायलटनं त्वरित समयसूचकता दाखलत तात्काळ ब्रेक लावत गाडी थांबवली. त्यानंतर तो कोच रिकामी करण्यात आली. तसंच हा कोच वेगळी करत आग पसरवण्यापासून थांबवण्यात आलं. या कोचमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहे. तसंच त्यांना अन्य कोचमध्ये हवण्यात आलं. यानंतर ट्रेन पुन्हा देहरादूनसाठी रवाना करण्यात आलं. घटनेचं गांभीर्य पाहता देहरादून रेल्वे स्थानकावर अॅम्ब्युलन्सही पाठवण्यात आल्या आहे.
दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या कोचला भीषण आग; सर्व प्रवासी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 3:02 PM
Delhi Dehradun Shatabdi Express fire : कोणत्या कारणामुळे आग लागली याचा तपास सुरू
ठळक मुद्देकोणत्या कारणामुळे आग लागली याचा तपास सुरूबोगी वेगळी करून ट्रेन करण्यात आली रवाना