शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Dengue: कोरोनानंतर आता डेंग्यूचा संसर्ग, 1537 जणांना लागण तर 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 3:07 PM

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने बाधित राज्यांना मदत करण्यासाठी तज्ञांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतडेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढल्याने चिंता आणखीनच वाढली आहे. गेल्या आठवड्यात डेंग्यूमुळे 5 मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे आता दिल्लीतील मृतांची संख्या एक वरून 6 झाली आहे. गेल्या आठवडाभरात डेंग्यूच्या नव्या रुग्णांची संख्याही 531 झाली. त्यानंतर आता एकूण रुग्णसंख्या 1537 वर गेली आहे. डेंग्यू आणि मलेरियासह चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे.

दिल्लीत सध्या मलेरियाचे 160 आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये 73 वरुन 81 पर्यंत वाढ झाली आहे. म्हणजेच चिकुनगुनियाचे आठ नवीन रुग्ण समोर आले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे आता परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दिल्ली महानगरपालिकेने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत आतापर्यंत एकूण 1,537 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरात एकूण आकडेवारीत रुग्णांची भरती अतिशय वेगाने झाली. म्हणजेच गेल्या आठवड्यात तीन महापालिकांव्यतिरिक्त नवी दिल्ली नगर परिषद, दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हद्दीत डेंग्यूचे 531 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर डेंग्यूमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे.

तज्ज्ञांचे पथक बाधित राज्यांमध्ये जाणारराजधानी दिल्लीत डेंग्यूमुळे बिघडलेल्या परिस्थितीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने बाधित राज्यांना मदत करण्यासाठी तज्ञांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सोमवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राजधानीतील डेंग्यूच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आढावा घेतला. यादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयावर भर देण्यात आला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्णय घेतला की, डेंग्यूने बाधित राज्यांची ओळख आणि केसलोड माहिती गोळा केली जाईल. यासोबतच या राज्यांमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांची टीम पाठवण्याची योजनाही केंद्र सरकारने आखली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे एका योजनेवर काम करण्यास सांगितले आहे. आरोग्यमंत्री मांडविया यांनी चाचणीचा वेग वाढवण्यास सांगितले आहे.

डेंग्यू तापग्रस्तांना मिळणार कोविड रुग्णांचे बेड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली सरकारने एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये कोविड-19 रुग्णांसाठी राखीव खाटांपैकी एक तृतीयांश डेंग्यू रुग्णांना देण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, कोरोना विषाणूची घटती प्रकरणे आणि डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली