शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

डॉक्टरांनी केला चमत्कार, १० वर्षांपासून बोलू शकत नव्हता मुलगा; सर्जरीनंतर परत मिळाला 'आवाज'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 8:28 PM

दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पीटलमधलं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे की जे एक चमत्कार म्हणून पाहिलं जात आहे. या हॉस्पीटलमध्ये एका मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली की जो गेल्या १० वर्षांपासून अधिक काळ ट्रॅकोस्टोपी ट्यूबद्वारे श्वास घेत होता.

नवी दिल्ली-

दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पीटलमधलं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे की जे एक चमत्कार म्हणून पाहिलं जात आहे. या हॉस्पीटलमध्ये एका मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली की जो गेल्या १० वर्षांपासून अधिक काळ ट्रॅकोस्टोपी ट्यूबद्वारे श्वास घेत होता. लहानपणी डोक्याला दुखापत झाल्यामुळे श्रीकांत बराच काळ व्हेंटिलेटरवर होता, त्यामुळे तो बोलू शकत नव्हता आणि प्रतिक्रियाही देऊ शकत नव्हता. दुखापतीमुळे श्रीकांतची श्वासोच्छवासाची नळीही काम करत नव्हती, त्यामुळे ट्रॅकोस्टोमी ट्यूबद्वारे श्वास घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

विंडपाइपचा काही भाग नसल्यामुळे श्रीकांतला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. श्वास घेण्यासाठी कोणतीच जागा नसल्यानं त्याचा आवाज येत नव्हता. मात्र १० वर्षांनंतर या मुलावर सर गंगाराम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्वासनलिका आणि आवाज पुनर्संचयित करण्याच्या शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी श्रीकांतला त्याचा श्वास आणि आवाज दोन्ही परत केले आहेत. श्रीकांत आता पूर्णपणे निरोगी आहे.

तज्ज्ञ म्हणाले 15 वर्षात अशी केस पाहिली नाहीयशस्वी ऑपरेशननंतर ईएनटी विभागाचे वरिष्ठ सल्लागार म्हणाले की, माझ्या 15 वर्षांच्या कार्यकाळात मी अशी केस पाहिली नाही. जेव्हा मी रुग्णाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला वाटले की ही खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल. मुलाच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलने थोरॅसिक सर्जरी, ईएनटी, पेडियाट्रिक इंटेसिव्ह केअर आणि ऍनेस्थेशिया या विभागातील डॉक्टरांचे एक विशेष पॅनेल तयार केले होते. 

शस्त्रक्रियेपूर्वी पालकांची परवानगी"रुग्णाची श्वासनलिका आणि विंड पाइप पूर्णपणे बंद झाला होता, त्यामुळे शस्त्रक्रिया करणे खूप अवघड होते, परंतु आमच्याकडे शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मुलाच्या पालकांना ऑपरेशनमध्ये खूप धोका असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मुलाचे ऑपरेशन सहा तास चालले", असं ऑपरेशनबाबत सर गंगाराम हॉस्पिटलचे ईएनटी डॉ. मनीष मुंजाळ म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्यdelhiदिल्ली