शहरं
Join us  
Trending Stories
1
तहव्वूर राणाचा आडमुठेपणा कायम! ३ तास NIA चौकशी, पण सहकार्य केले नाही; कोणते प्रश्न विचारले?
2
गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”
3
IPL च्या इतिहासात CSK वर पहिल्यांदाच आली ही वेळ! आता बालेकिल्ल्यात KKR नं दिला दणका
4
फुले चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये, ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल - अनंत महादेवन
5
काळीज हेलावेल...Video पाहून! बहुमजली इमारतीला आग लागली, मुलांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न
6
चाहते सोडा! CSK ची बॅटिंग बघून चीअर लीडर्सचाही पडला चेहरा; घरच्या मैदानात लाजिरवाणी कामगिरी
7
हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्र्यावर अत्याचार! पुण्यात नेमकं घडतंय काय?
8
IPL 2025 CSK vs KKR : टॉस गमावल्यावर MS धोनीनं केली रोहित शर्माची कॉपी, नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
कियाने आपली कार क्रॅश करायला दिली, भारत एनकॅपमध्ये किती सेफ्टी रेटिंग मिळाले?
10
ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा
11
“...तर ठाकरे गट मोठे आंदोलन करणार”; आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, पण मुद्दा काय?
12
हॉरिबल...! रेल्वे म्हणे नो ब्रेक, लोको पायलटने टॉयलेट अन् जेवणही करायचे नाही; तुरुंगापेक्षाही भयंकर...
13
काय सांगता! चीन बांधतंय जगातील सर्वात मोठा पूल, एका तासाचा प्रवास एका मिनिटात पूर्ण होणार
14
तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!
15
IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा
16
लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला
17
२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...
18
एका झाडामुळं शेतकऱ्याचं नशीब फळफळलं, रातोरात झाला ४.९७ कोटींचा मालक!
19
धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्याचा मृत्यू
20
"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा

दिल्लीसह NCRमधील काही भागात धुळीचे वादळ, पावसाच्या सरी; मेट्रो सेवा कोलमडली, विमाने वळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 22:52 IST

Delhi Dust Strom Rain News Updates: पुढील काही तास दिल्लीत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Delhi Dust Strom Rain News Updates: शुक्रवारी सायंकाळी अचानक दिल्लीतील वातावरण एकदम बदलून गेले. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वर जात असतानाच अचानक दिल्ली आणि लगतच्या परिसरात सुरुवातीला धुळीचे वादळ घोंगावले आणि त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, अचानक आलेल्या धुळीच्या वादळामुळे सायंकाळी घरी परतत असलेल्या चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. 

धुळीचे वादळ आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत येणारी अनेक विमाने अन्य मार्गांवर वळवण्यात आली. रात्री ९ वाजेपर्यंत दिल्लीला येणारी सुमारे १५ विमाने वळवण्यात आली होती. अचानक आलेले धुळीच्या वादळाचा फटका दिल्लीतील मेट्रो सेवेलाही बसला. दिल्लीतील मेट्रेसेवा कोलमडली. पूर्व दिल्लीतील मधु विहार पोलीस स्टेशन परिसरात जोरदार वादळामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. हवामान खात्याने पुढील काही तासांत दिल्ली आणि परिसरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता

वादळाचा दिल्ली मेट्रो सेवांवरही परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागात मेट्रोचा वेग कमी करण्यात आला. यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. वेग मर्यादेमुळे मेट्रो येण्यास विलंब होत होता. याचाही फटका प्रवाशांना बसला. पुढील तीन तासांत दिल्ली, एनसीआर, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या लगतच्या भागात विजांसह वादळ आणि जोरदार वारे येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. हवामान विभागाने लोकांना या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे मंडी हाऊस आणि दिल्ली गेटसह काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. एक झाड दुचाकीवर पडल्याने नुकसान झाले. झाडे कोसळल्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. 

 

टॅग्स :delhiदिल्लीRainपाऊस