Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 05:34 PM2020-02-02T17:34:54+5:302020-02-02T17:43:42+5:30

दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एकूण 672 उमेदवारांपैकी 20 टक्के म्हणजेच 133 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल.

delhi election 2020 36 out off 70 aap candidates have criminal cases | Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल

Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देदिल्ली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एकूण 672 उमेदवारांपैकी 20 टक्के म्हणजेच 133 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल.आम आदमी पक्षाच्या 51 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. भाजपाच्या 20 टक्के उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याविरोधात गंभीर गुन्हे असल्याचे नमूद केले.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि आपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. सत्तेत आल्यावर पारदर्शक कारभार करू असं आश्वासन सर्वच पक्ष देत असतात. दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एकूण 672 उमेदवारांपैकी 20 टक्के म्हणजेच 133 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

दिल्लीमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाच्या 51 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर)च्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे 25 टक्के उमेदवार आणि भाजपाच्या 20 टक्के उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याविरोधात गंभीर गुन्हे असल्याचे नमूद केले आहे. तसेच काँग्रेसच्या 15 टक्के उमेदवारांनीही आपल्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. 

Delhi Election Arvind Kejriwal fails to reach ECI office on time due to roadshow | Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज

आपच्या 36 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर भाजपाच्या 67 पैकी 17 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये काँग्रेस तिसऱ्या, तर बसपा चौथ्या स्थानी आहे. याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर आहे. 2015 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत अशा उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यावेळी निवडणूक रिंगणात 673 उमेदवार होते. त्यातील 17 टक्के म्हणजेच 114 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल होते. 

आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपाने तगडी फौज मैदानात उतरवली आहे. तब्बल 200 खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात आले आहे. ही 250 जणांची फौज हरवण्यासाठी येत असल्याची टीका आपने केली आहे. दिल्लीतील  70 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराने वेग घेतला आहे. 

Delhi Polls 2020: BJP bringing 200 MPs to defeat me, says Kejriwal | Delhi Election 2020 :

सत्ताधारी आप, केंद्रात सत्तेत असलेला भाजपा आणि दोन्हीकडे विरोधी पक्ष असलेला काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली आहे. भाजपाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. तब्बल 200, खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी येत आहेत. हे सर्व जण आपला हरवण्यासाठी मुक्काम ठोकणार असल्याचा जोरदार प्रचार आपच्या वतीने सध्या सुरू झाला आहे. सोशल मीडियासह विविध ठिकाणी आपद्वारे भाजपावर निशाणा साधला जात आहे. 

 

Web Title: delhi election 2020 36 out off 70 aap candidates have criminal cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.