नवी दिल्ली - दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराने वेग घेतला आहे. दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. गरीबांना 2 रुपये किलो दराने पीठ तर कन्या जन्मानंतर ती 21 वर्षाची झाल्यावर दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिल्लीकरांना दिले. महाविद्यालयात शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन भाजपाने दिले. आम आदमी पक्षाला मोफत योजनांवरून सतत धारेवर धरणाऱ्या भाजपाने मोफत वीज पाणी योजना सुरू ठेवण्याची अप्रत्यक्ष ग्वाही निवडणूक जाहीरनाम्यात दिली आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मनोज तिवारी यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. गेल्या तीन वर्षात सीलिंग कायद्यामुळे व्यापाऱ्यांतचे कंबरडे मोडले. त्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. सीलिंग समस्या सोडवू, कायद्यात बदल करू असे भाजपाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. दिल्ली देशाचे हृदय आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
देशासाठी अभिमानाचे शहर आहे. भाजपाचा इतिहासदेखील याच शहराशी संबंधित आहे. आधी अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते. आता नरेंद्र मोदींचे सरकार आहे. पुढच्या तीन वर्षात दिल्ली-मुंबई अंतर केवळ 12 तासांमध्ये पूर्ण करता येईल. जाहीरनाम्यात केवळ घोषणाही असे नमूद करून गडकरी म्हणाले, 11 लाख लोकांकडून मत मागवली तेव्हा कुठे हा जाहीरनामा तयार झाला आहे.
ही आहेत आश्वासने
- दिल्लीला टँकर माफियातून मुक्त करणार.
- घरोघरी नळाचे पाणी.
- 200 नव्या शाळा तर 10 नवी महाविद्यालये स्थापणार.
- आयुष्मानसह केंद्राच्या योजना राबवणार.
- समृद्ध दिल्ली पायाभूत योजनेवर 10 हजार कोटी खर्च करणार.
- 9 वीत गेलेल्या विद्यार्थिनीला मोफत सायकल.
- विधवा गरिब महिलेला कन्येच्या लग्नासाठी 51 हजार रुपये.
- कचरा विघटन केंद्रची समस्या सोडवू.
- 10 लाख रोजगारनिर्मिती.
- युवक, महिला व मागासवर्गीयांसाठी कल्याण मंडळ.
- यमुनेला स्वच्छ करू, तेथे आरती सुरू होईल.
- हातगाडीवर काम करणाऱ्यांना परवाना व सुरक्षा.
- स्वच्छता कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने वेतनवाढ.
- अधिकृत मान्यता मिळालेल्या नव्या वसाहतींच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ.
महत्त्वाच्या बातम्या
Budget 2020 Live Updates: मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार; महाराष्ट्राला काय मिळणार?
चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल
...म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला मोठा खुलासा